बुलडाणा -जन्मदात्या आईने भर थंडीत आपल्या नवजात बालकाला सोडून दिले. या बालकाच्या रडण्याच्या आवाजाने संपूर्ण गाव शहारले. या बालकाच्या मतिमंद आईने निष्ठुरता दाखवून बाळाला सोडले असले, तरी जागरूक नागरिकांनी मिळून दिलेली मायेची ऊब या बाळासाठी जीवनदायी ठरली. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील ठाकरे दाम्पत्याने या बाळाला कायदेशीररित्या दत्तक घेऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे.
जन्मदातीने भरथंडीत रस्त्यावर सोडले, मुलगा गमावलेल्या दाम्पत्यांनी दिली मायेची उब - बुलडाणा दत्तक बालक
गेल्या २-३ दिवसांपासून तपमान कमालीचे घसरले आहे. गुलाबी थंडी बोचरी बनली आहे. त्यातच शुक्रवारी पहाटेपासून वातावरण ढगाळ होते. या हवामानामुळे हुडहुडी भरविणारी थंडी पहाटेपासूनच होती. याच थंडीत नकोशा झालेल्या नवजात एक वर्षाच्या बालकाला त्याची आई जालना जिल्ह्यातील ढालसावंगी या गावात रस्त्याच्या कडेला सोडून निघून गेली. मात्र, बाळाच्या टाहोने या परिसरात रस्त्यावरून जाणारी वाहतूक थबकली अन्...
गेल्या २-३ दिवसांपासून तापमान कमालीचे घसरले आहे. गुलाबी थंडी बोचरी बनली आहे. त्यातच शुक्रवारी पहाटेपासून वातावरण ढगाळ होते. या हवामानामुळे हुडहुडी भरविणारी थंडी पहाटेपासूनच होती. याच थंडीत नकोशा झालेल्या नवजात एक वर्षाच्या बालकाला त्याची आई जालना जिल्ह्यातील ढालसावंगी या गावात रस्त्याच्या कडेला सोडून निघून गेली. मात्र, बाळाच्या टाहोने या परिसरात रस्त्यावरून जाणारी वाहतूक थबकली. रडणाऱ्या या अर्भकाला पाहून उपस्थित सर्व स्तब्ध झाले. स्थानिक नागरिकांनी याची माहिती येथील समाजभान या सामाजिक संस्थेला दिली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे पोहोचून थंडी आणि भुकेने रडणाऱ्या या बालकाला ताब्यात घेऊन रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर उपचार करून सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडले. त्यानंतर समाजभान समुहाचे दादासाहब थेटे आणि खिदमते मिल्लत संस्थेचे इरफान खान पठाण यांनी त्या निराधार मुलाला नवे आई, वडील मिळवून दिले. खामगाव येथील ठाकरे दाम्पत्यानेही अत्यंत मायेने लेकराला जवळ घेत त्याचा स्वतःचा मुलगा म्हणून पालकत्व स्वीकारले आणि त्या बाळाला मायेची उब दिली. समाजमन संस्था ही आंनदवन परिवाराशी जुडलेली असून ठाकरे दाम्पत्य हे आंनदवन परिवाराशी जुडले असल्याने आणि ठाकरे कुटुंबीयाला मुलं नसल्याची माहिती या संस्थेला असल्याने हा योगायोग जुळून आला.
ठाकरे दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा अपघातात ठार -
खामगाव येथील सचिन ठाकरे व त्यांच्या पत्नी मनीषा ठाकरे या दाम्पत्यास एक मुलगा होता. मात्र, 28 मे 2014 ला पुणे जिल्ह्यातील इंदापूरजवळ जालेल्या अपघातात त्यांचा एकुलता एक मुलगा देवांश ठाकरेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ठाकरे दाम्पत्याला मुलं होणे कठीण असल्याने ठाकरे दाम्पत्य नेहमी चिंतेत राहत होते. यांनतर त्यांची नाळ बाबा आमटे यांच्या आनंदवन सेवा प्रकल्पाशी जुळली. ते डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. विकास आमटे यांच्या माध्यमातून नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहत होते. तसेच खामगावच्या तरुण फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्यात पुढे राहायचे.