बुलडाणा - नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावर निमगाव फाट्यानजीक मंगळवारी दुपारी एका टेम्पोने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला जवळच्या नांदुरा येथील रुग्णालयात व नंतर अकोल्याला हलविण्यात आले आहे.
बुलडाण्यात टेम्पोची दुचाकीला धडक एक ठार, एक गंभीर - अपघात ताजी बातमी बुलडाणा
नांदुरा ते जळगाव या रस्त्यावर असलेल्या निमगाव फाट्यानजीक एका भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनिडोअर या प्रवासी वाहनाने समोरून येणाऱ्या एका मोटर सायकलला जोराची धडक दिली. यात कैलास आहुजा (वय 35) यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा-आसनगावजवळ कार आणि गॅस टँकरमध्ये भीषण अपघात; २ जण जागीच ठार, २ गंभीर
नांदुरा ते जळगाव या रस्त्यावर असलेल्या निमगाव फाट्यानजीक एका भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनिडोअर या प्रवासी वाहनाने समोरून येणाऱ्या एका मोटर सायकलला जोराची धडक दिली. या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडताच नागरिकांनी 108 या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णवाहिकेचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर प्रवाशांच्या मदतीने जखमीला नांदुरा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. यात कैलास आहुजा (वय 35) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोनी मोहनानी यांना नांदुरा येथून अकोल्यात रवाना केले आहे.