महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव टँकरची पाच वाहनांना धडक, अपघातात एक जण ठार - Buldana District Accident News

नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या भरधाव टँकरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच वाहनांना धडक दिली. या अपघतात एकजण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी मलकापूरजवळ हा अपघात घडला.

tanker hit five vehicles
भरधाव टँकरची पाच वाहनांना धडक

By

Published : Nov 4, 2020, 7:52 PM IST

बुलडाणा -नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या भरधाव टँकरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच वाहनांना धडक दिली. या अपघतात एकजण ठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी मलकापूरजवळ हा अपघात घडला.

दुपारी दोन वाजेच्या सुमारास नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या भरधाव टँकरने मलकापूर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या छोटा हत्ती, स्विफ्ट डिझायर, इंडिका यासारख्या पाच वाहनांना धडक दिली. या धडकेत एकाचा मुत्यू झाला आहे. पांडूरंग पाटील असे मृताचे नाव आहे. तर त्यांचा आठ वर्षांचा मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details