बुलडाणा- कोरोना काळात कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी मास्क लावणे गरजेच आहे. अशात शेगाव येथील स्वामी टलर्सचे मालक कृष्णा पाटील यांनी स्वतः शिवलेला मास्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवी दिल्ली येथील प्रधानमंत्री कार्यालाच्या पत्त्यावर पाठवला आहे. या मास्कचा स्वीकार केल्याबाबतचे पत्र पंतप्रधान कार्यालायकडून पाटील यांना प्राप्त झाला आहे.
शेगावातील टेलरने पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या मास्कचा प्रधानमंत्री कार्यालयाकडून स्वीकार
बुलडाणा जिल्ह्याच्या शेगावमधील एका टेलरने स्वतः शिवलेला मास्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या नवी दिल्ली येथील कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवले होते. ते मास्क प्राप्त झाल्याचे पत्र कृष्णा पाटील यांना प्राप्त झाले आहे.
शेगाव शहरातील टेलर कृष्णा पाटील हे नरेंद्र मोदी यांचे अनुयायी आहेत. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी त्यांच्या पध्दतीने एक खास मास्क शिवून पोस्टाद्वारे नवी दिल्ली येथील प्रधानमंत्री कार्यालयाच्या पत्त्यावर पाठविला होता. पंधरा दिवसानंतर पंतप्रधान कार्यालयातून पाठविण्यात आलेले पत्र त्यांना शेगाव येथे प्राप्त झाले. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांचे निदेशक चंद्रश सोना यांच्या स्वाक्षरी असून पंतप्रधान यांना आपल्याकडून पाठविलेला मास्क मिळाला आहे, असे नमूद करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी आपण दिलेला मास्क स्वीकारल्याचे पत्र वाचून अत्यंत आनंद झाला असल्याची भावना कृष्णा पाटील यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -शेतकरी विधेयकाच्या विरोधात गांधी जयंती दिनी काँग्रेस करणार निदर्शने