महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डांबरामध्ये भेसळ करणाऱ्या प्लांटवर तहसीलदारांचा छापा, साहित्य जप्त

खामगाव - अकोला रोडवरील एका अनधिकृत डांबर प्लांटमध्ये डांबर तयार करताना भेसळ केली जात असल्याची माहिती खामगाव येथील तहसीलदारांना मिळाली होती.

By

Published : Mar 8, 2019, 4:09 AM IST

डांबरामध्ये भेसळ करणाऱ्या प्लान्टवर तहसीलदारांचा छापा

बुलडाणा - खामगाव - अकोला रोडवरील एका अनधिकृत डांबर प्लांटमध्ये डांबर तयार करताना भेसळ केली जात असल्याची माहिती खामगाव येथील तहसीलदारांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी प्लांटवर छापा टाकला. त्या छाप्यात डांबरमध्ये मार्बल सदृश्य पावडरची भेसळ करताना काही जणांना रंगेहाथ पकडण्यात आले.

डांबरामध्ये भेसळ करणाऱ्या प्लान्टवर तहसीलदारांचा छापा

तहसीलदारांनी प्लांटवरील सर्व साहित्य जप्त करुन त्याला सील लावले आहे. खामगाव - अकोला मार्गावरील कोलोरी शिवारामध्ये एक अनधिकृत डांबर प्लांट आहे. त्याठिकाणी रस्ते बांधणीकरता लागणारे डांबर तयार केले जात होते. तहसीलदार शीतल रसाळ यांना सदर प्लांट अनधिकृत असून तेथे डांबरचे वजन वाढवण्याकरता मार्बल सदृश्य पावडरची भेसळ करुन डांबर बनवले जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुरुवारी तहसीलदार रसाळ यांनी सकाळी खामगाव ग्रामीण पोस्टच्या पोलिस पथकासह त्याठिकाणी छापा मारला. यावेळी डांबरमध्ये मार्बल सदृश्य पावडरची भेसळ करताना काही जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. हा प्लांट बबलू पंढरीनाथ महाजन (रा.जळगाव खानदेश) यांच्या मालकीचा असून तहसीलदारांनी सदर प्लांटवरुन १ बॉयलर, ५ इलेक्ट्रीक मोटर, जनरेटर, २१ डांबरचे भरलेले बॅरल, ३५ रिकामे बॅरल, १ दुचाकी, १ मेटॅडोरसह मार्बल सदृश्य पावडरचे सुमारे ११० पोते जप्त करुन सदर प्लान्टला सील केले आहे.

यावेळी पोलिसांनी प्लान्टवरील रामाप्रसाद रमाशंकर यादव याला ताब्यात घेतले आहे. हा डांबर कुठे वापरण्यात आला ? , याबाबत आणखी माहिती उघड होणार आहे . या प्रकरणाची चौकशी करून २ दिवसात गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details