महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बिल माफ केले नाही तर ऊर्जा मंत्री राऊत यांच्या घराचे वीज कनेक्शन कापू' - swabhimani agitation in buldana

सरकारने लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ केले नाही तर आम्ही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या घरांचे वीज कनेक्शन कापू, असा इशारा रविकांत तुपकरांनी या आंदोलनादरम्यान दिला.

swabhimani shetkari sanghatana
swabhimani shetkari sanghatana

By

Published : Mar 19, 2021, 8:26 PM IST

Updated : Mar 19, 2021, 8:38 PM IST

बुलडाणा -सक्तीची वीजबिल वसूली थांबवून कनेक्शन कापणे तत्काळ थांबवावे व लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टीच्या यांच्या सूचनेनुसार नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील पेठ गावाजवळील नागपूर-औरंगाबाद महामार्गावर आज शुक्रवारी 19 मार्च रोजी रास्तारोको करण्यात आला. जर सरकारने लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ केले नाही तर आम्ही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या घराचे वीज कनेक्शन कापू, असा इशारा रविकांत तुपकरांनी या आंदोलनादरम्यान दिला.

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर वाहनांच्या रांगा

यावेळी चाललेल्या रास्तारोको आंदोलनामुळे नागपूर-औरंगाबाद महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याने महामार्गावर अडीच तास वाहतूक खोळंबली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

लॉकडाऊनकाळातील वीजबिल माफी करण्यासाठी व सक्तीची वीजबिल वसूली थांबवून कनेक्शन कापणे तत्काळ थांबवावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सोमवारी 15 मार्च रोजी रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्ह्याच्या विद्युत महावितरण कार्यालयाची वीज बंद करून ठिय्या आंदोलन करून मागण्या मान्य न झाल्यास यानंतरही महावितरणाच्या विरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी आज शुक्रवारी रास्तारोको आंदोलन पुकारले होते. याच पार्श्वभूमीवर आज आंदोलन करण्यात आले.

Last Updated : Mar 19, 2021, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details