महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याच्या मागणीसाठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात विद्यार्थी रस्त्यावर - बुलडाण्यात शेतकरी संघटनेचा मोर्चा

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधीकाऱ्याना देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा मोर्चा

By

Published : Sep 21, 2019, 9:24 AM IST

बुलडाणा -शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व रविकांत तुपकर, राणा चंदन यानी केले. यावेळी महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा मोर्चा

या मोर्चामध्ये शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शीतल काळवाघे, शुभांगी पाटील, अश्विनी जाधव, सचिन मोतेकर, निरंजन राठोड, राहुल पवार, किसन लोखंडे या विद्यार्थ्यांनी मनोगतातून रोष व्यक्त केला. या मोर्चाचे व्यवस्थापन पवन नपटे, पवन दांडगे, प्रवीण चीम, दिपक शेळके, भागवत गावंडे, दगदीश पसरटे, दुपक जाधव, मोहित मानकर या विद्यार्थ्यांनी केले.

या आहेत प्रमुख मागण्या -

महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यात यावे व ही भरती प्रकिया M.P.S.C.च्या धरर्तीवर घेण्यात यावी. पोलीस भरतीच्या किमान 13 हजार जागा भरण्यात याव्यात. सर्व परीक्षांचे शुल्क कमी करून पूर्वी प्रमाणे 150 रुपये करण्यात यावे. सरकारने दिलेल्या वचनाप्रमाणे मेगा भरतीच्या 72 हजार जागा तात्काळ भरण्यात याव्यात. बँकिंग व M.P.S.C ची जास्तीत जास्त पदे भरण्यात येवून लवकरात लवकर निकाल लावण्यात यावा.

ABOUT THE AUTHOR

...view details