बुलडाणा- खामगावात चारा छावण्या सुरू करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. तालुक्यात मोठ्याप्रमाणात चारा आणि पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खामगाव तत्काळ चारा छावणी चालू करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी सुमारे 300 जनावरे घेऊन तहसीलदार शीतल रसाळ याच्या बंगल्यावर मोर्चा काढला. परंतु, बंगल्यावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी एमआयडीसी परिसरातच हा मोर्चा रोखला.
चारा छावण्या सुरू करा; स्वाभिमानीचा जनावरांसह तहसीलदारांच्या बंगल्यावर मोर्चा
संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्या नेवृत्तात जनावरांसह तहसीलदार बंगल्यावर मोर्चा काढला. यासाठी शेतकऱ्यांनी आपापली जनावरे खामगाव मार्गाने तहसीलदार यांच्या घराकडे वळवली पंरतु पोलिसांनी तो मोर्चा एमआयडीसी भागातच अडवला.
चारा छावणीच्या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी राजू नाकडे हे गेल्या आठ दिवसांपासून वाकुड येथे उपोषण करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्या नेवृत्तात जनावरांसह तहसीलदार बंगल्यावर मोर्चा काढला. यासाठी शेतकऱ्यांनी आपापली जनावरे खामगाव मार्गाने तहसीलदार यांच्या घराकडे वळवली पंरतु पोलिसांनी तो मोर्चा एमआयडीसी भागातच अडवला.
शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे या आंदोलनाची दखल तहसीलदार स्वतः आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेतुनही काही मार्ग निघाला नाही. त्यामुळे पुढील दोन ते तीन तास हे आंदोलन सुरूच राहिले. आंदोलक अधिकच आक्रमक होऊ लागल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी आंदोलनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चर्चेअंती चारा छावण्या सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही लवकरच चारा छावण्या सुरू करण्यात येतील, असे आस्वासन दिले आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे आणि नाकाडे यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.