बुलडाणा -सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मकाई साखर कारखाना ( Makai Sakhar Karkhana Case ) येथे काही कार्यकर्ते व शेतकरी ( Swabhimani Shetkari Sanghatana ) एफआरपीचे पैसे मागण्यासाठी गेले होते. दरम्यान साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल ( Chairman Digvijay Bagal ) यांनी मारहाण करत त्यांना बाहेर काढून दिले. यावर रविकांत तुपकर चांगलेच भडकले व उद्या आपण सोलापूरला जाणार आहोत. त्या मस्ती चढलेल्या दिग्विजय बागलची जिरवायला जात आहोत. शेतकऱ्यावर हात उचलणाऱ्याचे हात कलम करू, असा इशारा यावेळी रविकांत तुपकारानी ( Ravikant Tupkar ) दिला. तसेच त्या साखर कारखान्याला गाळप करण्याचा परवाना नाही तरी बेकायदेशीर गाळप सुरू आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांचे एफआरपीचे साडेसहा कोटी रुपये बुडविले, असे कारनामे कोणाच्या भरवशावर करत आहात? असा सवालही तुपकरांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूरचे युवक जिल्हाध्यक्ष विजय रणदवे हे थकित वीज बिलासंदर्भात बोलणी करण्यासाठी कार्यकर्त्यांसह मकाई कारखान्यावर गेले होते. त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्याचवेळी दिग्विजय बागल यांनी विजय रणदिवे यांना मारहाण केली.
'शेतकऱ्यांना भाव वाढीसाठी झगडावं लागतं'