महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Action Against Sand Miners : रेती साठ्यांवर उपविभागीय अधिकाऱ्याची धडक कारवाई; 540 ब्रास रेतीचा साठा जप्त

महसूल पथकाकडून (Raid by revenue team) अवैध रेती उपसा आणि साठवणूक करणाऱ्या पाच जणांवर (action against sand miners) करण्यात आलेल्या कारवाईत 540 ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. (sand mafia fined)  पथकाकडून रेती उपसा करणाऱ्या 5 बोटी, 2 टिप्पर आणि 2 पोकलॅंडही जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करणाऱ्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Action Against Sand Miners
महसूल विभाग पथक

By

Published : Dec 13, 2022, 4:00 PM IST

बुलडाणा : जिल्ह्यातील दिग्रस (Latest news from Buldana) येथे महसूल पथकाने धाड (Raid by revenue team) टाकून अवैध रेती उपसा आणि साठवणूक करणाऱ्या 5 जणांवर कारवाई (action against sand miners) करण्यात आली. या कारवाईत अवैध रेतीसाठा करणाऱ्या ना एक कोटी 36 लाखांचा दंड (sand mafia fined) ही ठोठावण्यात आला आहे. (Buldana Crime) 540 ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या बोटी

रेती माफियांमध्ये खळबळ :पथकाकडून रेती उपसा करणाऱ्या 5 बोटी, 2 टिप्पर आणि 2 पोकलॅंडही जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करणाऱ्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातून जाणाऱ्या खडकपूर्णा नदीपात्रातून रेती माफिया सर्रासपणे रेती उपसा करून त्याची चोरट्या मार्गाने विक्री करतात. त्यामुळे शासनाचा महसूल बुडतो. या कारवाईमुळे काही प्रमाणात का होईना महसूल जमा होण्यास मदत होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details