बुलडाणा - जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने तब्बल दीड लाख रूपये परत करत प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे दर्शन घडवले आहे. अरशद खान पठाण (रा. साखरखेडा) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
बुलडाण्यातील विद्यार्थ्याने दाखवला प्रामाणिकपणा; परत केले तब्बल दीड लाख
अरशद हा बुलडाणा येथील आयटीआय महाविद्यालयात शिक्षन घेत आहे. तो दररोज एसटी बसद्वारे अपडाऊन करतो. गुरूवारीही अरश हा मेहकर ते बर्हानपूर या बसद्वारे प्रवास करत होता.
अरशद हा बुलडाणा येथील आयटीआय महाविद्यालयात शिक्षन घेत आहे. तो दररोज एसटी बसद्वारे अपडाऊन करतो. गुरूवारीही अरश हा मेहकर ते बर्हानपूर या बसद्वारे प्रवास करत होता. या बसमध्ये त्याला एक मिळाली. ती बॅग उघडून पाहिल्यानंतर त्याला त्या बॅगेत दीड लाख रुपये रोकड आणि हिम्मतराव सिताराम पाटील या व्यक्तिच्या नावे दवाखान्याचे कागदपत्र मिळाले. तसेच कागदपत्रांवर त्याला बॅग धारकाचा संपर्क क्रमांकसुद्धा आढळून आला. यानंतर त्याने फोन केला. तसेच ते दीड लाख रुपये सह बॅग परत केली. अरशदने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा -रेल्वेबाबतच्या सर्व तक्रारींसह मदतीकरता 'हा' असणार एकच क्रमांक