महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. पायल तडवीची आत्महत्या नसून खूनच; मुंडन आंदोलन करत भीम आर्मीचा आरोप - communal crime

डॉक्टर पायल तडवी यांच्या हत्येच्या निषेधार्थ भीम आर्मी व बहुजन क्रांती मोर्च्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले.

मुंडण करताना कार्यकर्ते

By

Published : Jun 6, 2019, 8:30 PM IST

बुलडाणा - मुंबई येथील नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टर पायल तडवी यांच्या हत्येच्या निषेधार्थ भीम आर्मी व बहुजन क्रांती मोर्च्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. मुंडन करुन कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला.

विशाल काकोडे भीम आर्मी

मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांवर अ‍ॅट्रॉसिटी हिंसाचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. डॉ. पायल तडवी यांचीही रॅगींग आणि जातीय छळवणुक करून हत्या करण्यात आली. पायलच्या शरीरावर जखमा असल्याने ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप भीम आर्मीने केला.

भीम आर्मी व बहुजन क्रांती मोर्च्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर मुंडन आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पायलला न्याय देण्याची मागणी करण्यात आली. डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हे मुंडन आंदोलन करण्यात आले

डॉ. पायल तडवी हिने रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून २२ मे रोजी नायर रूग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details