महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेगाव नगरी दुमदुमली; गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त लाखो भाविकांची गर्दी - palkhi

आजच्या दिवशी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून गजानन भक्त दर्शनासाठी येत असतात. आज पहाटे ४ वाजल्यापासूनच या ठिकाणी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

गजानन

By

Published : Feb 25, 2019, 8:49 PM IST

बुलडाणा - 'गजानना अवलिया,अवतरले जग ताराया, गण गण गणात बोते'च्या गजरात शेगावच्याश्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने 'श्रीं'चा 141 वा प्रकट दिनोत्सव सोहळा आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीभाव आणि उत्साही वातावरणात साजरा झाला.

गजानन


या उत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. आजच्या दिवशी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून गजानन भक्त दर्शनासाठी येत असतात. आज पहाटे ४ वाजल्यापासूनच या ठिकाणी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. हजारो दिंड्या पायी वारी करत शेगावात दाखल झाल्या असून संस्थानच्या वतीने त्यांना विविध सुविधा पुरवल्या जात आहेत.
या प्रकटदिनोत्सवाला 20फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. याअंतर्गत दररोज काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम होत आहेत. शिवाय दुपारी निघालेल्या पालखी सोहळ्याने शेगाव नगरी दुमदुमून उठली होती.


प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला हजारो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. गजानन महाराजांच्या दर्शनासाठीभाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भपंढरीत झाली आहे.१४१ वर्षापूर्वी संत गजानन महाराज यांनी शेगावलाधार्मिक कार्यक्रम असताना उश्ठ्या पत्रावळी शोध करताना प्रगट झाले होते, अशी आख्यायिका गजानन महाराज विजय ग्रंथात आहे.तर आज मोठ्या उत्साहात हा प्रगट दिन गण गण गणात बोतेच्या गजरात होत आहे. शेगावलाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा उत्सव भाविक ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजराकरतात . अन्नादात्याकडून ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरणही केल्या जाते.

२३ मे १९७८ रोजी आजच्या दिवशी गजानन माउली शेगाव नगरीत प्रगटली होती. आजच्या दिवशी पातुरकर यांच्या वाड्या समोर एका कार्यक्रमात उष्ठ्या पत्रावळी मधून अन्न शोधत असताना गजानन महाराज प्रकट झाले होते. ते सर्वप्रथम बंकटलाल आगरवाल व दामोद पंत यांना दिसले होते ते १९७८ आज या घटनेला 141 वर्ष झाली आहेत. तेव्हापासून शेगाव संस्थान हा उत्सव साजरा करतो. या प्रकटदिन सोहळ्याला राज्यातून भाविक भक्त मोठ्या उत्साहाने येत असतात. परदेशात ही हा उत्सव साजरा केला जातोय. भक्तांमध्ये गजानन महाराजाबद्दल अशी भावना आहे की, त्यांनी जे काही बाबांना मागितले ते सर्व इच्छा पूर्ण होते. म्हणून भाविकबाबाच्या दर्शनाकरिता शेगावला येतात. आज दुपारी श्रींची पालखी शहरातून निघाली होती, डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा होता. संतनगरी शेगांव दुमदुमली होती. आलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर यामुळे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. पालखी सोहळा शहरातून परिक्रमा करून नंतर सोहळ्याची सांगता होते.

ABOUT THE AUTHOR

...view details