महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात उद्यापासून 20 में पर्यंत कडक लॉकडाऊन - Strict Lockdown Buldana Rajendra Shingane Information

जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ही साखळी तोडण्याच्या दृष्टिकोनातून पुढील दहा दिवस म्हणजे 20 में पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या बाबतचे निर्देश बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी एस. रामामूर्थी यांनी आदेश निर्गमित केले.

Strict Lockdown Buldana Rajendra Shingane Information
कडक लॉकडाऊन बुलडाणा राजेंद्र शिंगणे माहिती

By

Published : May 9, 2021, 9:46 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ही साखळी तोडण्याच्या दृष्टिकोनातून पुढील दहा दिवस म्हणजे 20 में पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या बाबतचे निर्देश बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी एस. रामामूर्थी यांनी आदेश निर्गमित केले.

माहिती देताना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

सर्व लोकप्रतिनिधींनी केली एक मुखाने कडक लॉकडाऊनची मागणी

लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत होती. म्हणून बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे, अशा सूचना लोकप्रतिनिधींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. या बैठकीदरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने कडक लॉकडाऊन लावण्या संदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी एक मुखाने मागणी केली. त्यामुळे, 10 मे ते 20 मे असा दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन बुलडाणा जिल्ह्यामध्ये लागू करण्यात येणार आहे.

या सेवा राहणार बंद

मेडिकल सेवा वगळता इतर आस्थापने पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्या अंतर्गत एसटी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या शिवाय इतर धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे, तसेच कडक लॉकडाऊन पाळण्याच्या दृष्टीने विशेष आदेश पोलीस विभागाला देण्यात आले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, संजय कुटे, श्वेताताई महाले, आकाश फुंडकर, राजेश एकडे यांच्यासह जिल्हाधिकारी राममूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -बुलडाणा येथे शॉटसर्किटने शेतातील एक एकर ऊसासह तीन एकरातील ठिंबक जळून खाक

बैठकीदरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आढावा आणि वैद्यकीय सुविधेचा आढावा घेण्यात आला. सोबतच जिल्ह्यामध्ये करण्यात येत असलेल्या लसीकरणासंदर्भातील माहितीही यावेळी जाणून घेण्यात आली. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लसीकरण करण्यासंदर्भातही संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्या.

हेही वाचा -रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांचा पर्दाफाश, बुलडाण्यात 2 नामांकित हॉस्पिटलमधील 3 कर्मचारी पोलिसांच्या जाळ्यात

ABOUT THE AUTHOR

...view details