महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 4, 2022, 7:35 PM IST

ETV Bharat / state

ST Employee death: बुलडाण्यात संपकरी एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

एसटी कर्मचारी सिद्धार्थ इंगळे यांच्या मृत्यूनंतर कर्मचारी संतप्त झाले ( ST employee death in Buldhana ) आहेत. मृत्यू झालेल्या या कर्मचाऱ्याला 9 डिसेंबर रोजी एसटी महामंडळ कार्यालयाने नोटीस बजाविली होती. कर्मचाऱ्याला बरखास्त का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली ( ST employee death after ST notice ) होती.

एसटी कर्मचारी सिद्धार्थ इंगळे
एसटी कर्मचारी सिद्धार्थ इंगळे

बुलडाणा- राज्य सरकारने वेतनवाढ करूनही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बुलडाणा आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ( ST employee death in Buldhana ) झाला आहे. ही घटना आज ( 4 जानेवारी ) समोर आली आहे. सिद्धार्थ इंगळे असे निधन झालेल्या कर्मचाऱ्याच नाव आहे.

एसटी कर्मचारी सिद्धार्थ इंगळे यांच्या मृत्यूनंतर कर्मचारी संतप्त झाले आहेत. मृत्यू झालेल्या या कर्मचाऱ्याला 9 डिसेंबर रोजी एसटी महामंडळ कार्यालयाने नोटीस बजाविली होती. कर्मचाऱ्याला बरखास्त का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली ( ST employee death after ST notice ) होती.

हेही वाचा-ST Employee Strike: ५३ दिवसांनंतर पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून केले बाहेर!

तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप-

8 जानेवारीपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश कर्मचाऱ्याला देण्यात आले होते. कर्मचाऱ्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू ( ST employee death in strike ) आहे. या कर्मचाऱ्याचा मृत्यू तणावामुळे ( state transport employee death in Buldhana ) झाल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.


हेही वाचा-St Employee Strike Solapur: आंदोलकांनी सेवा समाप्त झालेल्या 34 कर्मचाऱ्यांचा हार घालून केला सत्कार

एसटी महामंडळाकडून कारवाई सुरू-

गेल्या दोन महिन्यांपासून अधिकाळ संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे एसटी महामंडळाने आवाहन केले. तरीदेखील कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. महामंडळाने 110 हून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 925 वर पोहचली आहे. याशिवाय आतापर्यंत महामंडळाने 11 हजार 24 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details