बुलडाणा - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागत आटोपली आहे. या पेरणीसाठी कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यात 7 लाख 35 हजार हेक्टर क्षेत्रफळावर पेरणी अपेक्षित आहे. यापैकी 3 लाख 85 हजार क्षेत्रफळावर सोयाबीनचा, तर 2 लाख हेक्टर क्षेत्रफळावर कपाशीची लागवड अपेक्षित आहे. उर्वरित क्षेत्रफळावर इतर पिकांचीही पेरणी होणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात यंदा 7 लाख 35 हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षीत -कृषी अधिकारी नरेंद्र नाईक - Agriculture Officer Narendra Naik's agricultural information
बुलडाणा जिल्ह्यात यंदा पेरणीसाठी कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यात 7 लाख 35 हजार हेक्टर क्षेत्रफळावर पेरणी अपेक्षित आहे. याबाबतची जिल्हा कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी माहिती दिली आहे.
![बुलडाणा जिल्ह्यात यंदा 7 लाख 35 हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षीत -कृषी अधिकारी नरेंद्र नाईक बुलडाणा जिल्ह्यात पेरणीला सुरुवात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12128418-645-12128418-1623670490692.jpg)
खरीप पेरणीसाठी कृषी विभागाकडून बियाण्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःकडील साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या बियाण्याचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यानुसार या बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्यात आली आहे. तर, जिल्ह्यामध्ये 26 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे 3 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यापैकी 5 हजार शेतकऱ्यांकडील जास्तीचे असलेले बियाणे हे इतर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यात काही प्रमाणात सोयाबीन बियाण्यांची कमतरता असून, खामगाव तालुक्यातून या शेतकऱ्यांना बियाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर खाजगी कंपनीकडूनदेखील बियाणे प्राप्त होत आहे. अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिली आहे.