बुलढाणा :राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. क्रूर मुलाने पित्याचा खून केल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील अडोळ फाट्यावर घटना घडली आहे. बाप लेक एका वीट भट्टीवर काम करत होते. यामध्ये मुलगा चाळीस वर्षाचा झाला तरी बाप लग्न करून देत नसल्याने मुलगा भानसिंग भैरड्या हा नाराज होता. त्याने वडील नानसिंग भैरड्या यांच्या डोक्यात काठी मारून त्यांचा खून केला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. जळगाव जामोद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ जाऊन मुलास ताब्यात घेऊन अटक केली आहे.
डोक्यातच बांबूच्या काठीने मारहाण: बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथून जवळच असलेल्या, घाट पळशी ते पळशी फाटा पिंपळगाव काळे शिवारा मधील हरिभाऊ दयाराम तायडे यांच्या वीट भट्टीवर पिता-पुत्रांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. मुलगा भाऊ सिंग भैरड्या (40) याने वडील भानसिंग वर्ष (६०) यांचा डोक्यातच बांबूच्या काठीने मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.