बुलडाणा -आपल्या शेतातील कृषिपंप सरकविण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राला पंपातील विद्युत शॉक लागला. यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आज (रविवारी) १७ मेच्या पहाटे लोणार तालुक्यातील हिरडव येथे घडली. जनार्दन निवृत्ती मैराळ (वय 50) आणि नीलेश जनार्दन मैराळ (वय 34) अशी मृत पिता-पुत्रांची नावे आहेत.
अचानक वीजपुरवठा सुरू झाला अन् पिता-पुत्राने जीव गमावला - lonar police station latest news
दोन्ही पिता पुत्र आपल्या शेतालगत असलेल्या तलावावर शेती सिंचनासाठी लावण्यात आलेली शेती कृषीपंप थोडा मागे सरकविण्यासाठी गेले होते. यावेळी वीज नसल्याने कृषीपंप बॅकवाटरजवळ नेण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, अचानक विद्युत पुरवठा सुरू झाला आणि पंपामधील विद्युत प्रवाह पाण्यात उतरला.
![अचानक वीजपुरवठा सुरू झाला अन् पिता-पुत्राने जीव गमावला पिता-पुत्राचे मृतदेह](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7235233-thumbnail-3x2-mum.jpg)
हे दोन्ही जण आपल्या शेतालगत असलेल्या तलावावर शेती सिंचनासाठी लावण्यात आलेली शेती कृषीपंप थोडा मागे सरकविण्यासाठी गेले होते. यावेळी वीज नसल्याने कृषीपंप बॅकवाटरजवळ नेण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, अचानक विद्युत पुरवठा सुरू झाला आणि पंपामधील विद्युत प्रवाह पाण्यात उतरला. त्यामुळे दोन्ही शेतकरी पिता-पुत्राला जोरदार शॉक लागला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना या भागात पहाटे अशाच कामासाठी आलेल्या काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. यानंतर त्यांची धावपळ सुरू झाली.
दरम्यान, सकाळी लोणार पोलास ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तर दोघे पिता-पुत्राचे पाण्यात पडलेले मृतदेह बाहेर काढले.