बुलडाणा- दुर्मिळ मांडूळ जातीचा साप विक्रीसाठी पकडून विक्रीसाठी ठेवणाऱ्या राजूर येथील श्रीकृष्ण काटे या आरोपीला मुंबई वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे. यावेळी त्याच्या जवळून मांडूळ जातीचा २ किलो वजनाचा साप जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तस्कर हा परराज्यात मांडूळ विक्री करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्यास अटक; मुंबई वनविभागाची धडक कारवाई - वन्यजीव संरक्षण अधिनियम
दुर्मिळ मांडूळ जातीचा साप पकडून विक्रीसाठी ठेवणाऱ्या राजूर येथील श्रीकृष्ण काटे या आरोपीला मुंबई वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे. यावेळी त्याच्या जवळून मांडूळ जातीचा २ किलो वजनाचा साप जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मोताळा तालुक्यातील राजूर गावात मुंबई येथील वनविभागाच्या पथकाला मांडूळ जातीचा साप असून तो परराज्यात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पथकाने राजूर येथील श्रीकृष्ण काटे याच्या घरी छापा मारून घराची झडती घेतली. त्यावेळी पथकाला तेथे मांडूळ जातीचा २ किलो वजनाचा साप आढळून आला.
हा साप आरोपी काटे याने विक्रीसाठी पकडून ठेवल्याचे निष्पन्न झाले. तर हा साप परराज्यात विक्रीसाठी जाणार असल्याचेही आरोपीच्या मोबाईलवरून समजले. त्यामुळे वनविभागाने आरोपी श्रीकृष्ण काटे याला अटक करून त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.