महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'श्रीं'चा १४२ वा प्रकट दिन; शेकडो दिंड्या शेगावात दाखल, भाविकांची गर्दी - shegaon news

श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने ‘श्रीं’चा १४२ वा प्रकट दिनोत्सव १५ फेब्रुवारीला लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.

shegaon
'श्रीं'चा १४२ वा प्रकट दिन

By

Published : Feb 12, 2020, 1:33 PM IST

बुलडाणा - श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने ‘श्रीं’चा १४२ वा प्रकट दिनोत्सव १५ फेब्रुवारीला लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. या दिनानिमित्त ९ फेब्रुवारीपासूनच शेगावात उत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. भाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भाच्या पंढरीत पाहायला मिळत आहे.

श्रींच्या प्रकट दिनानिमित्त संस्थानच्यावतीने ९ फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काकड आरती, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे दैनिक कार्यक्रम सध्या होत आहेत. १५ फेब्रुवारीला सकाळी श्रींच्या प्रागट्या’ निमित्त कीर्तन होईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता यज्ञाची पूर्णाहूती होईल. दुपारी दोन वाजता श्रींच्या पालखीची रथ, मेणा, गज यासह नगर परिक्रमा निघेल. यानंतर १६ फेब्रुवारीला काल्याचे कीर्तन होऊन उत्सवाची समाप्ती होणार आहे.

दरम्यान, मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, मंदिराकडे जाणारा रस्ता एकेरी करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी व श्री मुख दर्शनबारी, महाप्रसाद, श्रींचा पारायण मंडप, श्रींची गादी, पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि मंदिर परिसर केळीच्या खांबांनी सजवण्यात येणार आहे. भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्यावतीने सर्वतोपरी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सेवाधारी वर्ग आपली सेवा पूर्ण करत आहेत. चौकट -नियनांची पूर्तता करणाऱ्या दिंड्यांना अंशदान शिरच्या १४२ च्या प्रकटदिन उत्सवादरम्यान आतापर्यंत शेकडो दिंड्यांचे शेगावात आगमन झाले होते. हा आकडा वाढून एक हजारांच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सहभागी होणार्‍या नवीन दिंड्यांना नियमांची पूर्तता केल्यावर टाळ, वीणा, मृदंग, हातोडी, सहा पताका, ज्ञानेश्‍वरी, एकनाथी भागवत ग्रंथ, तुकाराम गाथा असे संत साहित्य संस्थानच्यावतीने वाटप केले जात आहे. त्याचबरोबर नियमित येणार्‍या दिंड्यांना साहित्य दुरुस्तीकरिता अंशदान दिले जाते. या सर्व दिंडीतील सहभागी वारकर्‍यांसाठी श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने मोफत दवाखाना, महाप्रसाद व ज्या भजनी दिंड्या आपल्या सोयीनुसार राहण्यासाठी राहोटी करतात, अशांकरिता व्यवस्थित ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भजनी दिंड्या आपल्या सोयीनुसार श्रींच्या मंदिरात श्रींच्या समाधीचे व कळस दर्शन करून आपल्या नित्यमार्गाने जात आहे.

एस टी महामंडळ सज्ज

श्रीसंत गजानन महाराज प्रकट दिन यात्रा महोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळानेही जादा बस गाड्यांची व्यवस्था केली आहे. शेगाव येथे होणारी गर्दी पाहता जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव आणि शेगाव आगाराकडून ५० जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरात अखंड महाप्रसाद -

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन उत्सवानिमित्त श्री गजानन सेवा समितीतर्फे संतनगरीत येणारे भाविक भक्त व दिंड्यांसाठी 14 व 15 फेब्रुवारीला अखंड महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील अग्रसेन चौकात स्थित मुरारका जीनच्या आवारात ही व्यवस्था करण्यात आली आहे.

पालिका सभागृहात उंदीर, मग मुंबई कशी स्वच्छ ठेवणार?

कडोंमपात युती तुटल्याने मनसेच्या विरोधीपक्ष नेतेपदावर भाजपचा ताबा

ABOUT THE AUTHOR

...view details