महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारत बंदला बुलडाण्यात संमिश्र प्रतिसाद; रॅली काढून दर्शविला 'सीएए'ला विरोध

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात बुधवारी (दि. 29 जानेवारी) भारत बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी बुलडाणा शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला.

By

Published : Jan 30, 2020, 10:19 AM IST

रॅलीत सहभगी आंदोलनकर्ते
रॅलीत सहभगी आंदोलनकर्ते

बुलडाणा- एनआरसी, सीएए व एनपीआरच्या निषेधार्थ बुधवारी (दि. २९ जानेवारी) बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला बुलडाणा शहर व जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी बुलडाणा शहरात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रॅली काढून एनआरसी, सीएएचा विरोध केला.

रॅलीत सहभगी आंदोलनकर्ते

भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर लोकसभा व राज्यसभेत सीएए कायदा मजूर केला. त्याचबरोबर एनआरसी व एनपीआर कायद्याबाबत चर्चा सुरू आहे. याला सर्वधर्मीयांचा महाराष्ट्रासह देशभरात विरोध आहे. हे कायदे आणून देशात जातीयवाद निर्माण करण्याचा भाजप प्रयत्न असल्याचा आरोपही विविध पक्षांकडून होत आहे. त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती.

हेही वाचा - बेकायदा उत्खनन बंद व्हावे म्हणून शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

या बंदला शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतांश व्यावसायिकांची दुकाने उघडी होती. त्यामुळे नागरिकांना कुठलीच अडचण झाली नाही. दरम्यान, सकाळी साडे अकराच्या सुमारास विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जयस्तंभ चौकात सुरु असलेल्या 'शाहीनबाग' या आंदोलन स्थळापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत विविध समाजाचे शेकडो नागरिक, युवक व महिला सहभागी झाल्या होत्या. ही रॅली जयस्तंभ चौक, बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक, तहसील चौक, आयडीबीआय बँक चौक, संगम चौक मार्गे जयस्तंभ चौकातील शाहीनबाग या आंदोलनाच्या ठिकाणी आली. या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार, सीएए, एनआरसी, एनआरपी कायद्याविरोधात घोषणाबाजी करुन शहर दणाणून सोडले होते. या बंदला विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला. रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा - भारत बंद: शेगावात हजारो नागरिक रस्त्यावर; व्यापारी आणि आंदोलकांमध्ये वाद

ABOUT THE AUTHOR

...view details