महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात जन आशीर्वाद यात्रे दरम्यान आदित्य ठाकरेंसमोर शिवसेनेचे दोन गट उघड... - shivsena party

शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरु असून ही यात्रा गुरुवारी 29 ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्यात आली होती. जिल्ह्यातील शिवसेनेने आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत केले. मात्र, बुलडाण्यात शिवसनेत थेट दोन गट असल्याचे आदित्य ठाकरेंच्या समोर आले.

जन आशीर्वाद यात्रा

By

Published : Aug 30, 2019, 3:01 AM IST

बुलडाणा - बुलडाण्यात शिवसेनेचा अंतर्गत वाद जन आशीर्वाद यात्रेदरम्यान गुरुवारी 29 ऑगस्टला थेट आदित्य ठाकरे यांच्या समोर आला. यामध्ये एका गटाने बुलडाण्यात सभा आयोजित केली तर दुसऱ्या गटातर्फे शहराबाहेर येळगाव येथे आदित्य ठाकरेंच्या जंगी स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जन आशीर्वाद यात्रे दरम्यान आदित्य ठाकरेंसमोर शिवसेनेचे दोन गट उघड


शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरु असून ही यात्रा गुरुवारी 29 ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्यात आली होती. जिल्ह्यातील शिवसेनेने आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत केले. मात्र, बुलडाण्यात शिवसनेत थेट दोन गट असल्याचे आदित्य ठाकरेंच्या समोर आले.


आदित्य यांची एक सवांद सभा शहरातील जयस्तभं चौकातील गांधी भवन परिसरात झाली. तिथून सभा संपल्यानंतर ही जन आशीर्वाद यात्रा चिखली इथे जाणार होती. दरम्यान बुलडाणा शहराबाहेरील येळगाव फाट्यावर पोहचताच यात्रा तेथे थांबली आणि तिथेही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दोन्ही सभेदरम्यान पहिल्या सभेच्या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव सह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, येथे बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे हे उपस्थित नव्हते. तर, या ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये आणि सभामंचावर माजी आमदार विजयराज शिंदे नव्हते.


दुसऱ्या ठिकाणी गावाबाहेर झालेल्या सभेच्या मंचावर आदित्य ठाकरे यांच्या सोबत बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे हेच हजर होते. त्यांच्या देखील स्वागत बोर्डावर आणि मंचावर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख खा. प्रतापराव जाधव हे आदित्य ठाकरेंच्या सोबत असतांना उपस्थित नव्हते. तर, यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. यावरून शिवसेनेची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. तर, शिवसेनेचे युवाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या समोरच बुलडाण्यात शिवसनेमध्ये दोन गट असल्याचे देखील समोर आले.

ABOUT THE AUTHOR

...view details