बुलडाणा - एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाणमध्ये दम नाही, अशी टीका करत आपल्या विभागात आल्यावर हिशोब विचारतो, अशा शब्दात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना आव्हान दिले आहे. एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी कर्नाटकात एका सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली. तर त्यांनी माफी दबावापोटी मागितली. मात्र, त्यांच्या या वक्तव्यातून त्यांच्या पोटीतील जहर बाहेर आले, अशी टीकाही त्यांनी केली.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अधिवेशनात उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर आधारित प्रश्नांसंदर्भात माहिती देण्यासाठी आज (शनिवारी) स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा -मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची बैठक; १७ मार्चला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी