बुलडाणा - जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन महिला अधिकाऱ्यावर कार्यालयीन वेळेत गैरहजर राहिल्याप्रकरणी तसेच कामांसाठी आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा आरोप शिवसेनेचे गणेश सोनुने यांनी केला आहे. यासाठी त्यांनी अमरावती विभागाच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
बुलडाणा : उपप्रादेशिक परिवहन महिला अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार - buldana RTO news
जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन महिला अधिकाऱ्यावर कार्यालयीन वेळेत गैरहजर राहिल्याप्रकरणी तसेच कामांसाठी आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा आरोप शिवसेनेचे गणेश सोनुने यांनी केला आहे.
बुलडाणा : उपप्रादेशिक परिवहन महिला अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार
याबाबत 'ईटीव्ही भारत'ने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या 17 डिसेंबर व आज शुक्रवारी (18 डिसेंबर) रोजी कार्यालयात न आल्याची माहिती मिळाली.