महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेगावात रस्ते कामाकरिता 52 घरे जमीनदोस्त; 150 पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई - Shegaon development work news

रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या 52 मालमत्ताधारकांना शासकीय मदत पुरविण्यात आली. यापैकी 40 मालमत्ताधारकांनी शासकीय मदत स्वीकारली आहे. तर 12 मालमत्ताधारकांनी ही मदत अत्यल्प सांगून स्वीकारली नाही.

अतिक्रमणावर कारवाई
अतिक्रमणावर कारवाई

By

Published : Jan 22, 2021, 10:03 PM IST

Updated : Jan 22, 2021, 10:28 PM IST

बुलडाणा -शेगाव विकास आराखडा अंतर्गत रेल्वे स्थानक ते संत श्री गजानन महाराज मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या 52 मालमत्ता आज जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. ही अतिक्रमणावरील कारवाई 150 पोलिसांच्या बंदोबस्तात पार पडली आहे. कारवाई करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शेगाव विकास आराखडा अंतर्गत शहरातील विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामधील काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. यामध्ये रेल्वे स्थानक ते श्री संत गजानन महाराज मंदिराला जोडणाऱ्या आरडी 14 या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ झाला आहे. यामध्ये या रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या 52 मालमत्ताधारकांना शासकीय मदत पुरविण्यात आली. यापैकी 40 मालमत्ताधारकांनी शासकीय मदत स्वीकारली आहे. तर 12 मालमत्ताधारकांनी ही मदत अत्यल्प सांगून स्वीकारली नाही.

पोलीस बंदोबस्तात पाडले घर

हेही वाचा-हे तर पवारांचे स्वत:विरूध्दच आंदोलन- केशव उपाध्ये

पोलिसांनी बळाचा वापर करून केली कारवाई-

अखेर 150 पोलिसांच्या बंदोबस्तात नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने या भागातील मालमत्ता जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. दरम्यान, या भागातील काही लोकांनी या मोहिमेला विरोध दर्शविला. महिलेने तर आपल्याला आधी राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावे, यानंतरच आमचे घर पाडावे अशी आग्रही मागणी धरली आहे. त्यामुळे काही वेळ पोलिसांची तारांबळ उडाली. यानंतर पोलिसांनी बळाचा प्रयोग करीत महिलेला ताब्यात घेतले आहे. महिलेला पोलिस स्टेशनला हलविल्यानंतर तिचे घर जमीनदोस्त करण्यात आले.

मालमत्ता धारक महिला म्हणाली की, दोन चौरस मीटरचे पैसे मंजूर झाले आहेत. मात्र, पैसे मिळाले नाहीत. मुलासंह कुठे जाऊ. घराच्या मोबदल्यात घर द्यावे. जर मोबदला मिळाला नाही तर मुले आणि सासुसह आत्महत्या करू, महिलेने इशारा दिला आहे.

हेही वाचा-ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष; तीन पक्षांना मिळून यश मिळवता आलं नाही - फडणवीस

Last Updated : Jan 22, 2021, 10:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details