बुलडाणा -जिल्ह्यातील शेगाव शहरात पुरवठा करण्यात येणारे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा धक्कादायक अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे शेगाव नगरपरिषदेत एकच खळबळ उडाली आहे. हा अहवाल प्राप्त होताच नगर परिषदेकडून शहर व परिसरातील लिकेजेस काढण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
शेगाव शहरातील पाणी पिण्यास अयोग्य.. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचा धक्कादायक अहवाल - शेगाव पाणीपुरवठा अहवाल
शेगाव शहरातील श्रीराम नगर परिसरामध्ये मागील अनेक दिवसांपासून नळाला येणारे पाणी दूषित असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी नगर परिषदेकडे केल्या होत्या. त्यानंतर शेगाव शहरातील सात ठिकाणचे पाणी नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासण्यात आले. हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
शेगाव शहरातील पाणी पिण्यास अयोग्य
गोळा करण्यात आलेल्या नमुन्यामध्ये धक्कादायक बाब समोर आली असून शहराला केला जाणारा वाण धरणातील पाणी पुरवठा हा पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल नगर परिषदेकडे व तक्रारकर्त्या नागरिकांना नुकताच प्राप्त झाला असून यामुळे नगर परिषद प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. यामुळेच नगर परिषद प्रशासनाने शुद्ध पाणीपुरवठा नागरिकांना करण्यात यावा त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषदेने दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.