बुलडाणा- बंगळुरु येथील वेल्लमा शहरानजीक झालेल्या कार अपघातात बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील ६ जणांसह चालक ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात भुसावळ डीआरएम कार्यालयातील कंट्रोल रूम येथे रेल्वे सुरक्षा बलाचे हवालदार मिलिंद देशमुख यांच्या कुटुंबातील ६ जण ठार झाले आहेत. ते बंगळुरू येथे फिरायला गेले होते. हा अपघात आज (सोमवार) दुपारी २ वाजता झाला.
आनंद देशमुख यांचे कुटुंब देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी बंगळुरूमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची माहिती आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास देशमुख कुटुंबाच्या कारची एका टँकरला धडक बसली. ज्यामध्ये कुटुंबातील सहा जण तर कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात तीन पुरुष, दोन महिला आणि दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.
समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टँकरला कारची जोरात धडक झाल्याने या अपघातात कोणीही बचावले नाही. तर हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील मृतदेह कार कापून बाहेर काढावे लागले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर अपघाताची माहिती आनंद देशमुख यांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सात मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, देवदर्शनासाठी जात असलेल्या संपूर्ण कुटुंबाचा असा अंत झाल्यामुळे देशमुख परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरात शोककळा आहे.
राज्याचे राज्यमंत्री रविंद चव्हाण यांचे अंगरक्षक आनंद देशमुख यांच्या परिवारातील सदस्यांचा यात समावेश आहे.
मृतांची नावे -
(1) मिलिंद नारायण देशमुख
(2)किरण मिंलिद देशमुख
(3)आदित्य मिंलिद देशमुख
(4)अंजिक्य मिंलिद देशमुख
(5)राजेश नारायण देशमुख
(6)सारिका राजेश देशमुख
(7)गाडी चालक