बुलडाणा - जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी 7 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 260 पर्यंत पोहोचली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या स्वॅबच्या अहवालांपैकी गुरुवारी 101 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 94 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 7 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
बुलडाण्यात 7 कोरोनाबाधित वाढले; रुग्णसंख्या पोहोचली 260 वर....
बुलडाणा जिल्ह्यात गुरुवारी 7 रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे रुग्णंसख्या 260 वर पोहोचली असून 154 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 94 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
7 रुग्णांमध्ये खामगांव येथील 18 वर्षीय महिला व 32 वर्षीय महिला, साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा येथील 35 वर्षीय महिला, शक्तीनगर मलकापूर येथील 75 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 24 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 19 वर्षीय तरुण व माळवंडी ता. बुलडाणा येथील 40 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात गुरुवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 260 वर पोहोचली आहे. त्यापैकी 154 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या 94 कोरोनाबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडे 2792 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत तर 293 नमुने अहवाल प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.