बुलडाणा- कोरोनाला हरविण्यासाठी रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटांकरिता घरातील लाईट बंद करून मोबाईल टॉर्च, मेणबत्ती आणि दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला बुलडाण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले. काही ठिकाणी इमारतीवर लाईट बंद करून मोबाईलचे ट्रॉच, मेणबत्ती आणि दिवे लावून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तर जनता कर्फ्यू मध्ये पंतप्रधान मोदींच्या आवाहनवर टाळ्या वाजविणारे महाविकास आघाडीचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी मात्र आपल्या घरातील लाईट बंद न करता मोबाईल टॉर्च किंवा मेणबत्ती किंवा दिवे लावले नसल्याचे दिसले.
बुलडाण्यात दिवे लावण्याच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद, मंत्री डॉ. शिगणेंनी नाही केले घरातील लाईट बंद - बुलडाणा कोरोना संख्या
बुलडाण्यात दिवे लावण्याच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले. काही ठिकाणी इमारतीवर लाईट बंद करून मोबाईलचे ट्रॉच, मेणबत्ती आणि दिवे लावून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
सध्या संपूर्ण भारत देश कोरोना विषाणुविरोधात लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन करीत संध्याकाळी 5 वाजता अत्यावश्यक सेवेतील सहभागी होणाऱ्याचे अभिनंदन करण्यासाठी टाळ्या, शंखनाद, थाळी वाजवण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी बुलडाण्यात याला सुरक्षित अंतर न ठेवता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर देशात 21 दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती. पुन्हा कोरोनाला हरविण्यासाठी एकजुटाने रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटाकरिता घरातील लाईट बंद करून मोबाईल टॉर्च, मेणबत्ती आणि दिवे लावण्याचे आवाहन मोदी यांनी केले होते. या आवाहनाला बुलडाण्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. तर महाविकास आघाडीचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी मात्र आपल्या घरातील लाईट बंद न करता मोबाईल फैश किंवा मेणबत्ती किंवा दिवे लावले नसल्याचे दिसले.