महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंदखेडराजा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सतीश तायडे विजयी - Buldana

सिंदखेड राजाचे नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे सतीश तायडे हे निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देविदास ठाकरे यांचा दीड हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

सिंदखेड राजाचे नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे सतीश तायडे हे निवडून आले आहेत.

By

Published : Mar 25, 2019, 3:02 PM IST

बुलडाणा -सिंदखेड राजाचे नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे सतीश तायडे हे निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देविदास ठाकरे यांचा दीड हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. तर शिवसेनेचे ७, राष्ट्रवादीचे ८ , १ अपक्ष तर १ ठिकाणी भाजपचा नगरसेवक विजयी झाला आहे.

शिवसेनेचे सतीश तायडे गराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा नगरपालिकेची निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. सिंदखेडराजाचे माजी आमदार व राष्ट्रवादीकडून लोकसभेचे उमेदवार माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व सिंदखेड राजा विधानसभेचे विद्यमान आमदार शशिकांत खेडेकर यांनी या निवडणूकीत आपल्या परीने खेळी खेळली. यामध्ये डॉ. शशिकांत खेडेकर यांनी बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव केला आहे. या पराभवमागे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी खेळलेली खेळी असल्याची चर्चा सध्या सिंदखेडराजा मध्ये रंगत आहे.

नगरपालिका निवडणूकीचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत दिसणार आहे. सिंदखेडराजा हे डॉ. शिंगणे यांचा गडकिल्ला आहे. या गडामध्ये त्यांच्या आदेशानुसारच पुढील रणनीती आखली जाते. लोकसभेत डॉ. शिंगणे यांचा पराभव झाला, तर सिंदखेडराजामध्ये विधानसभा निवडणुकीत डॉ. शिंगणे पुन्हा शिवसेनेचे आमदार शशिकांत खेडेकर यांच्या विरोधात निवडणुक रिंगणात असू शकतात. यामुळेच सिंदखेडराजामध्ये नगरपालिकेत शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. तर शिवसेनेला मिळालेल्या नगराध्यक्ष पदाची संपूर्ण भरपाई येणाऱ्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या स्वरूपात मिळणार असल्याची ही चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details