महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 21, 2021, 2:35 AM IST

ETV Bharat / state

बुलडाण्यात 27 जानेवारीला होणार सरपंचपदाची आरक्षण सोडत

बुलडाणा जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत 27 जानेवारी रोजी तहसील कार्यालयात होणारअसून महिला सरपंचपद आरक्षणाची सोडत २९ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

Sarpanch post  Reservation Lottery
Sarpanch post Reservation Lottery

बुलडाणा- ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2020 ते 2025 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच पदांचे आरक्षण 27 जानेवारी 2021 रोजी होणार असून तहसिल स्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार हे निश्चित करणार आहेत.

महिला आरक्षणाची सोडत 29 जानेवारीला -

तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रियांकरीता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रियांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी याबाबतची नोंद सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरीकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details