महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोषी अधिकाऱ्यांना कडक शासन करणार - कामगारमंत्री डॉ. संजय कुटे - कंपनी स्फोट, धुळे

सदर प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. घटनेत जे कामगार मृत्युमुखी पडले आहेत तसेच जखमींना योग्य मोबदला देणार असल्याचेही संजय कुटे यांनी सांगितले. मंगळवारी मंत्रालयाच्या दालनात राज्याच्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावून निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कामगारमंत्री डॉ. संजय कुटे

By

Published : Aug 31, 2019, 9:30 PM IST

बुलडाणा- धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील एका रसायन कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सदर कंपनी अतिसंवेदनशील आहे. प्रत्येक महिन्याला या कंपनीची तपासणी करणे गरजेचे असते. मात्र, तशी तपासणी झाली नसल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे.

स्फोटप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कडक शासन करणार

हेही वाचा - धुळे स्फोट प्रकरण; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

सदर प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. घटनेत जे कामगार मृत्युमुखी पडले आहेत, तसेच जखमींना योग्य मोबदला देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंगळवारी मंत्रालयाच्या दालनात राज्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावून निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी जळगाव जामोद येथील आयोजित कामगार मेळाव्यात दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details