महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Gaikwad on Sanjay Raut : राऊतांच्या विधानावर संजय गायकवाड यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'आम्ही युद्धात उतरत आहोत...' - आमदार संजय गायकवाड

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्या दरम्यान केले. राऊतांच्या विधानावर बुलढाणाच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, घोडा मैदान जवळच आहे. मैदानात उतरल्यावर युद्धाच्या परिणामांची पर्वा केली जात नाही. आमच्या सर्व युद्ध्यांमध्ये जिंकण्याची ताकद आहे. यामुळे महापालिकानिवडणूकी आम्हीच जिंकणार, असा विश्वास संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

Sanjay Gaikwad on Sanjay Raut
संजय गायकवाड

By

Published : Feb 10, 2023, 7:28 PM IST

आमदार संजय गायकवाड प्रतिक्रिया व्यक्त करताना

बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत मुक्कामी आले तरी मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकणार, असे विधान खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्या दरम्यान केले होते. राऊतांच्या विधानावर बुलढाणाच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड ? : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राऊतांच्या विधानावरून टीका केली आहे. ते म्हणाले की, आम्ही युद्धात उतरत आहोत आणि योद्धा हे परिणामांचा विचार करत नाही. घोडा मैदान जवळच आहे. मैदानात उतरल्यावर युद्धाच्या परिणामांची पर्वा केली जात नाही. आमच्या सर्व युद्ध्यांमध्ये जिंकण्याची ताकद आहे. यामुळे महापालिकानिवडणूकी आम्हीच जिंकणार, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत ? :पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत, किंवा ते स्वतः तारीख ठरवत नाहीत. तोपर्यंत कदाचित त्यांचा मुक्काम मुंबईतच राहू शकतो. कारण, बृहमुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी महाराष्ट्राचे भाजपचे आणि मिंधे गटाचे नेते असमर्थ आहेत, हेच यावरून दिसून येते. इथे मोदी किती वेळा आले किंवा अख्खा देश जरी त्यांनी इथे लावला, जसे इतर राज्यांमध्ये लावतात. तरी मुंबई महानगरपालिकेत शिवसेना जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावरून संजय गायकवाडांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा मुंबईत आले आहेत. महिनाभरात हा पंतप्रधानांचा दुसरा मुंबई दौरा आहे. एकाच महिन्यात पंतप्रधानांचा हा दुसरा मुंबई दौरा असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या दौऱ्यात पंतप्रधान वंदे भारत एक्सप्रेसच्या दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपास हे दोन रस्त्यांचे लोकार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते केले जात आहे.

वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. मुंबई-सोलापूर व मुंबई-शिर्डी अशा या दोन वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. मुंबईतील सीएसएमटी येथून मोदींनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री देखील यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :PM Flag Off Vande Bharat Train Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा

ABOUT THE AUTHOR

...view details