महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Gaikwad On Raut : एकनाथ शिंदेंना लाचार म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी आरशात तोंड बघावं- आमदार संजय गायकवाड

महाराष्ट्राच्या खुर्चीवर अत्यंत लाचार मुख्यमंत्री बसवल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केली. या टीकेला बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad ) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sanjay Gaikwad Reaction
संजय गायकवाड

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 7:49 PM IST

प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड

बुलडाणा : एकनाथ शिंदे हे लाचार झाले असून सत्ताधाऱ्यांपुढे त्यांनी गुडघे टेकले असल्याची टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केली होती. या टीकेला बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदेंना लाचार म्हणणाऱ्या संजय राऊत यांना लाज वाटली पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी स्वाभिमान काय असतो हे अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्यांनी आरशात आपलं तोंड पाहावं असा सल्ला आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad ) यांनी दिला आहे.

संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर: यावेळी मुंबईचा घास एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोदी शाहांच्या सरकारला दिला असल्याच्या टीकेवर देखील, मुंबईचा घास कोणीही हिरावू शकत नाही. मुंबई महाराष्ट्राचा मुकुटमनी आहे. वीस वर्ष ज्यांनी महापालिकेत सत्ता उपभोगली त्यांनीच मुंबईचं वाटोळं केलं असल्याचं म्हणत संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.



मुंबईत होत असलेल्या बैठकीवरही जोरदार टीका : मोदींना फाईट देण्याची ताकद कुणामध्ये नाही. संजय राऊत नावाची घाण आमच्याकडे नको आहे. संजय राऊत हे ज्या पक्षासोबत जातात तो पक्ष संपतो. त्यामुळे संजय राऊत यांना दिल्लीतून कोण फोन करणार आहे ? तर संजय राऊत यांना सुद्धा दिल्लीतून भाजपा सोबत येण्यासाठी फोन आल्याचा दावा संजय राऊत यांनी केल्यानं आमदार संजय गायकवाड म्हणाले की, संजय राऊत यांना कोण फोन करणार आहे? ही घाण आम्हाला नको आहे. अशी टीका, संजय गायकवाड यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी एनडीए इंडिया आघाडीच्या मुंबईत होत असलेल्या बैठकीवरही जोरदार टीका केली आहे. यांनी कितीही बैठका घेतल्या तरी मोदींना टक्कर देणारा चेहरा काल्पनिक इंडियाकडे नसल्याचं संजय गायकवाड म्हणाले आहेत.

हेही वाचा -

Sanjay Gaikwad Reaction : आगामी निवडणुकीपूर्वी रस्सीखेच; शिंदे गट लढवणार शंभरच्यावर जागा, संजय गायकवाड यांचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details