बुलडाणा - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहलेल्या पुस्तकाचे आज दिल्लीत प्रकाशन झाले. यामध्ये नरेंद्र मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. यावरुन भाजपवर जोरदार टीका होताना दिसत आहे. या पुस्तकाच्या मुद्यावरुन खासदार छत्रपती संभाजीराजेंनीही टीका केली आहे. मोदीच काय तर कोणाचीच छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.
'मोदीच काय तर कोणाचीच शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही' - Narendra modi book published
'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहलेल्या पुस्तकाचे आज दिल्लीत प्रकाशन झाले. यामध्ये नरेंद्र मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. यावरुन भाजपवर जोरदार टीका होतना दिसत आहे. या पुस्तकाच्या मुद्यावरुन खासदार छत्रपती संभाजीराजेंनीही टीका केली आहे.
!['मोदीच काय तर कोणाचीच शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही' sambhaji maharaj comment on Narendra modi book](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5687565-thumbnail-3x2-lalala.jpg)
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संभाजीराजे बोलत होते. यावेळी त्यांनी या पुस्तकावर टीका केली. या पुस्तकावर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बंदी आणावी, असे आवाहनही संभाजीराजेंनी यावेळी केले.
जय भगवान गोयल नावाच्या भाजप नेत्याने हे पुस्तक लिहिले असून, त्यांनी ट्विट करून पुस्तक प्रकाशित केल्याची माहिती दिली. दिल्लीच्या भाजप कार्यालयात शनिवारी 'धार्मिक सांस्कृतिक संमेलन' आयोजित करण्यात आले होते. यामध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
TAGGED:
Narendra modi book published