महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

समुपदेशन किटमध्ये दिले रबरी लिंग.. प्रात्यक्षिक करायचे कसे? आशा वर्कर्स समोर पेच - रबरी लिंग समुपदेशन किट महाराष्ट्र

राज्य सरकारकडून कुटुंब नियोजनासाठीच्या समुपदेशन किटमध्ये रबरी लिंग दिल्याचे समोर आले आहे. यामुळे आशा वर्कर्स नाराज झाल्या असून त्यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Mar 21, 2022, 10:59 AM IST

Updated : Mar 21, 2022, 11:54 AM IST

बुलडाणा - राज्य सरकारकडून कुटुंब नियोजनासाठीच्या समुपदेशन किटमध्ये रबरी लिंग दिल्याचे समोर आले आहे. यामुळे आशा वर्कर्स नाराज झाल्या असून त्यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. आता या किटने समुपदेशन करावे तरी कसे? असा पेच आशा वर्कर्स समोर उभा ठाकला आहे.

किट

हेही वाचा -BSNL Godown Fire : खामगावमधील बीएसएनएल कार्यालय परिसरात भीषण आग

हा प्रकार समोर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारला लक्ष केले आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सराकरचे डोके ठिकाण्यावर आहे का? असा सवाल करत या प्रकरावर संताप व्यक्त केला.

चित्रा वाघ यांचे ट्विट

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले 35 रुपये रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाही.. वर हे अजून.. थोडी लाज ठेवा. मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका. अशी टीक चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर ट्विटद्वारे केली आहे.

सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले - पालकमंत्री राजेंद्र शिंगणे

बुलडाणा येथील कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग आढळून आल्याप्रकरणी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बुलडाणा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

शिंगणे म्हणाले, यामध्ये कोणी दोषी असेल, कोणी जाणून बुजून केले असेल, अशांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. हा राष्ट्रीय कार्यक्रम असून, कुणी या कार्यक्रमात बाधा आणण्याचे काम करत असेल तर जबाबदारी ठरवून कारवाई करण्याचा इशारा शिंगणे यांनी दिला.

हेही वाचा -MLA Shweta Mahale Against Case : आमदार श्वेता महाले यांच्यावर गुन्हा दाखल

Last Updated : Mar 21, 2022, 11:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details