बुलडाणा - जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोंडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विश्वी गावातील विश्वामित्र मंदिराच्या उत्तरेकडे असलेल्या खुल्या जागेत कुजलेल्या अवस्थेत वृद्धाचे मृतदेह आढळल्याची घटना शनिवारी 13 मार्च रोजी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. सदर वृद्ध कोण आहे याचा तपास पोलीस करीत आहे.
बुलडाण्याच्या विश्वीजवळ आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह - mehkar police station
कुजलेल्या अवस्थेत वृद्धाचे मृतदेह आढळल्याची घटना शनिवारी 13 मार्च रोजी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. सदर वृद्ध कोण आहे याचा तपास पोलीस करीत आहे.
Rotten body
मृतदेहाचे जनावरांनी तोडले लचके
डोंडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विश्वी गावातील नागरिकांना शनिवारी विश्वामित्र मंदिराच्या उत्तरेकडे असलेल्या खुल्या जागेत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह पडल्याचे दिसले. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. सदर मृतदेहाची माहिती डोंडगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून सदर मृतदेहाची पाहणी केली. मृतदेहाचे जनावरांनी अक्षरश: लचके तोडल्याचे दिसत होते. यावेळी पोलिसांनी पंचनामा करीत हा मृतदेह कोणाचा आहे, याचा तपास सुरू केला आहे.