बुलडाणा- कोणाला निवडून द्यायचे हा लोकांचा निर्णय आहे. पहिल्यांदा निवडणूक लढवून निवडून येताना आपण घराणेशाही म्हणू शकतो. पण, दुसऱ्या निवडणुकीला ते घराणेशाही म्हणून निवडून येत नाहीत, तर ते त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने निवडून येत असतात, असे उत्तर राजकारणात घराणेशाहीलाच का संधी दिली जाते? या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी दिले.
राजर्षी शाहू फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून 'युवा संवाद' कार्यक्रमाचे जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानात आयोजन केले होते. यावेळी पवार यांनी युवक, युवतींच्या प्रश्नांना उत्तरे दिली.