महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सराफा दुकानातील लाखोंच्या दागिन्यांवर चोरट्यांचा भरदिवसा डल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद - श्रीकृष्ण ज्वेलर्स

नेहमीप्रमाणे सिंदखेडराजा येथील व्यापारी पिंटू उर्फ प्रदीप केशवराव इवरकर हे सोमवारी सकाळी ११ ला त्यांच्या श्रीकृष्ण ज्वेलर्स दुकानाच्या शटरचे कुलुप उघडले. त्यानंतर सोन्या चांदीची बॅग ठेवून दुसऱ्या शटरचे कुलूप उघडण्यासाठी गेले. यावेळी, अज्ञात चोरट्याने पाळत ठेऊन दुकानातील सोन्या-चांदिच्या दागिन्यांनी भरलेली बॅग उचलून पोबारा केला. सदर घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

buldana
चोरट्यांनी भरदिवसा पळविले लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने,

By

Published : Dec 9, 2019, 8:28 PM IST

Updated : Dec 9, 2019, 9:02 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील श्रीकृष्ण ज्वेलर्स येथून चोरट्यांनी सोमवारी भरदिवसा धाडसी चोरी करून लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने पळविल्याची घटना घडली. सदर चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

लाखोंच्या दागिन्यांवर चोरट्यांचा भरदिवसा डल्ला

नेहमीप्रमाणे सिंदखेडराजा येथील व्यापारी पिंटू उर्फ प्रदीप केशवराव इवरकर हे सोमवारी सकाळी ११ ला त्यांच्या श्रीकृष्ण ज्वेलर्स दुकानाच्या शटरचे कुलुप उघडले. त्यानंतर सोन्या चांदीची बॅग ठेवून दुसऱ्या शटरचे कुलूप उघडण्यासाठी गेले. यावेळी, अज्ञात चोरट्याने पाळत ठेऊन दुकानातील सोन्या-चांदिच्या दागिन्यांनी भरलेली बॅग उचलून पोबारा केला. यानंतर, चोर दुकानापासून थोड्याच अंतरावर असलेल्या मुंबई नागपूर हायवेपर्यंत पळत गेला. तेथून त्याच्याच मागून त्याचे दोन्ही साथीदार दुचाकीवर आले आणि त्याला गाडीवर बसवून तिघेही फरार झाले. दुकानातील व इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या चोरट्याचे व त्याच्या दोन्ही साथीदारांचे व्हिडिओ कैद झाले आहे. सदर घटना शहारामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि श्रीकृष्ण ज्वेलर्स येथे बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली होती.

हेही वाचा - मलकापुरात संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने मिरवणुकीचे आयोजन

याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी सर्वत्र नाका बंदी केली आहे.

हेही वाचा - दिव्यांग महिला बलात्कार व हत्या प्रकरण : आरोपीस 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Last Updated : Dec 9, 2019, 9:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details