बुलडाणा- तुखामगावातील महावीर मार्केटजवळील एचडीएफसी बँकेसमोर बुधवारी वाहनाचे ऑइल गळत असल्याचे सांगत लक्ष विचलित करून 25 लाख रुपयांची बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून तीन चोरटे बॅग घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
चोरट्यांची शक्कल : गाडीतून ऑइल गळत असल्याचे सांगत 25 लाख केले लंपास - khamgaon police station
खामगावातील महावीर मार्केटजवळील एचडीएफसी बँकेसमोर बुधवारी वाहनाचे ऑइल गळत असल्याचे सांगत लक्ष विचलित करून 25 लाख रुपयांची बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून तीन चोरटे बॅग घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
जय किसान खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष भागदेवानी (वय २५) बुधवारी दुपारी महावीर मार्केटजवळील एचडीएफसी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून 25 लाख रुपये काढून आपली बॅग गाडीत (एमएच 28-5625) ठेवली आणि वाहनात बसले. त्यांच्यासमोर एक अज्ञात व्यक्ती आली आणि म्हणाली, तुमच्या गाडीचे ऑइल गळत आहे. त्यामुळे आशिष हे गाडीचे ऑइल पाहण्यासाठी गाडीतून खाली उतरले. ऑइल पाहत असताना दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या गाडीमधील बॅग काढून घेतली. आशिष गाडीत बसल्यानंतर मागील सीटवर ठेवलेली बॅग गायब झाल्याचे लक्षात आले. बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी तसेच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबेडकर हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एचडीएफसी बँकेतील तसेच परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यात अज्ञात चोरटे दुचाकीवर बॅग घेऊन जाताना दिसले.