महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोरट्यांनी दोन लाखांची बॅग पळवली; मलकापूर शहरातील भर चौकातील घटना

मलकापूर शहरातील निमवाडी चौक परिसरात गुरुवारी रात्री ऑटोवरून आलेल्या चोरट्यांनी अडत व्यावसायिकाच्या हातातील 2 लाख 31 हजार रुपये असलेली बॅग घेऊन पोबारा केल्याची घटना घडली.

robbery-at-malakapur
चोरट्यांनी दोन लाखांची बॅग पळवली; मलकापूर शहरातील भर चौकातील घटना

By

Published : Nov 28, 2019, 1:20 PM IST

बुलडाणा - मलकापूर शहरातील निमवाडी चौक परिसरात गुरुवारी रात्री ऑटोवरून आलेल्या चोरट्यांनी अडत व्यावसायिकाच्या हातातील 2 लाख 31 हजार रुपये असलेली बॅग घेऊन पोबारा केल्याची घटना घडली.

चोरट्यांनी दोन लाखांची बॅग पळवली; मलकापूर शहरातील भर चौकातील घटना

हेही वाचा - महावितरणचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात; लाचेची रक्कम ऐकून व्हाल थक्क

अडत व्यापारी सुगनचंद कोचर हे दिवसभराचे काम आटोपून घरी पायी परत जात असताना रात्री 9 च्या सुमारास आलेल्या एका ऑटो रिक्षामधील चोरट्याने कोचर यांच्या हातातील बॅग पळवली. त्यानंतर रिक्षा वेगाने गांधी चौकच्या दिशेने निघाला. रिक्षाचा पाठलाग कोचर यांनी व तेथील नागरिकांनी काही अंतरापर्यंत केला. मात्र, ऑटो रिक्षा वेगात असल्यामुळे चोरट्यांना पळून जाण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिसरातील दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले आहेत. मात्र, शुक्रवारी सकाळपर्यंत काहीही निष्पन्न झाले नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - बुलडाण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाला जबर मारहाण करुन चोर फरार

ABOUT THE AUTHOR

...view details