बुलडाणा - खामगावामध्ये गुरुवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर ट्रक अडवून लूटमार करण्यात आल्याची घटना घडली होती. तर यापूर्वी बुधवारी मध्यरात्री संग्रामपूर तालुक्यातील आवार कोद्री रस्त्यावर ३ चोरट्यांनी दुचाकीस्वाराला मारहाण करुन बळजबरीने 2 मोबाईलसह 15 हजार रोख हिसकावून पळून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
हेही वाचा -परवाना नसलेल्या बंदुकीची गोळी लागून मेव्हणी जखमी, जि.प. सदस्य अटकेत
कोद्री येथील भारत वानखडे हे आपल्या गावाकडे जात असताना दुचाकी नादुरुस्त झाल्याने वानखडे यांनी आवार येथील मित्र शेख राजीक यांना दुरध्वनीव्दारे दुचाकी नादुरुस्त झाल्याची माहिती देऊन कोद्री गावात सोडण्यास सांगितले. यावरून शेख राजीक व संतोष गायगोळ हे दुचाकी घेऊन घटनास्थळी आले असता, शेतात दबा धरून बसलेल्या ३ चोरट्यांनी फायटर व पाईपद्वारे भारत वानखडे, शेरव राजीक, संतोष गायगोळ यांना जबर मारहाण करुन दोन मोबाइल व खिशातील १५ हजार रोख हिसकावून घेतली. व तेल्हाराकडे धुम ठोकली.