महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संग्रामपूर तालुक्यात चोरट्यांचा कृषी केंद्रावर दरोडा - buldana police

विधानसभा निवडणुकीत सर्व जण व्यस्त असल्याचा फायदा चोरटे उचलत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी रात्री चांगेफळ, जामोद या गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी गावातील दोन कृषी केंद्राच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. २ पंखे व ३५०० रुपये रोख रक्क्म तसेच ९८०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.

संग्रामपूर तालुक्यात चोरट्यांचा कृषी केंद्रावर दरोडा

By

Published : Oct 12, 2019, 1:49 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील जामोद आणि चांगेफळ येथे कटावनीने दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. यात चोरांनी लाखोंची रोकड व साहित्य चोरून नेले असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

संग्रामपूर तालुक्यात चोरट्यांचा कृषी केंद्रावर दरोडा

हेही वाचा - ठाण्यातील कुख्यात सिद्धू स्थानबद्ध, नाशिकच्या कारागृहात रवानगी

विधानसभा निवडणुकीत सर्व जण व्यस्त असल्याने याचा फायदा चोरटे उचलत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी रात्री तांगाव आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चांगेफळ, जामोद या गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी गावातील दोन कृषी केंद्राच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. २ पंखे व ३५०० रुपये रोख रक्क्म तसेच ९८०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.

तर दुसरीकडे जामोदमध्ये एका सराफादुकानासह किराणा दुकान आणि वाहनात भरलेल्या मलावरही चोरट्यांनी हाथ साफ केले. या गावातून चोरीला गेलेल्या मालाची रक्कम ही ५० हजाराच्या जवळपास आहे.
चांगेफळ फाटा येथे संदिप अंबादास उकर्डे, राजकुमार राठी व अतुल भोपळे यांचे कृषी केंद्र असून १० आक्टोबरला रात्री २ वाजता चार अज्ञात चोरट्यांनी उकर्डे व राठी कृषी केंद्राचे कुलूप वाकवून आत प्रवेश केला. गल्ल्यातील प्रत्येकी ३५०० रुपये २ पंखे असा एकूण ९८०० रुपयाचा माल लंपास केला. तर भोपळे यांच्या कृषी केंद्राचे शटरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. यानंतर चोरट्यांनी चांगेफळ येथून आकोली बु. येथील सुरेश श्रीधर रावणकार यांचे घरातून २० हजार रुपये व किराणा दुकानील ९५०० रुपये लंपास केले. गावातील विश्वजीत वक्टे यांच्या घरात प्रवेश करून पलंगावरील गादीच्या खाली ३३०० रुपये लंपास केल्याची घटना सुद्धा एकाच रात्री घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीला अश्लील बोलणाऱ्या मित्राचे अपहरण करून हत्या

संबंधीतांनी वेगवेगळया दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ४५७, ३८० भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ठाणेदार भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार ज्ञानसिंग राठोड करत आहे. हे तपास करत आहेत. चांगेफळ येथे एका कृषी केंद्रात चोरी करतांना तेथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

हेही वाचा - दहा महिन्याच्या मुलाला जन्मदात्या आईने फेकले विहिरीत; शेलुबाजार येथील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details