बुलडाणा - मागील 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून येळगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तर, बुलडाणा-चिखली मार्ग पाण्यामुळे १ तासापासून बंद असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 वाहनांमध्ये अडकलेल्या 6 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबायचे नाव घेत नाही. संततधार पावसामुळे बुधवारी संध्याकाळी पैनगंगा नदीला पूर आला आहे. यामुळे आगोदरच 100 टक्के भरलेले येळगाव धरण ओवरफ्लो झाले असून बुलडाणा-चिखली मार्ग गेल्या 1 तासापासून बंद आहे. या रस्त्यावरुन वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात 2 वाहन अडकले होते त्यात असलेल्या 6 लोकांना महसूल विभागाने सुखरूप बाहेर काढल्याची माहिती येळगावचे तलाठी झगरे यांनी दिली आहे तर त्यांचे वाहन सद्या पाण्यात अडकलेले आहेत.