बुलडाणा - शहरातील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये एटीएम कार्ड विसरल्याने सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ऑनलाइन शॉपिंगद्वारे 2 लाख 6 हजार 600 रुपयांचा गंडा अज्ञाताने घातला. या प्रकरणी सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव विकास मल्लिकार्जून क्यावल असे असून ते जिजामाता नगरमधील रहिवासी आहेत.
सेवानिवृत्त अधिकाऱ्याला बुलडाण्यात 2 लाख 6 हजाराचा गंडा
या प्रकरणी सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव विकास मल्लिकार्जून क्यावल असे असून ते जिजामाता नगरमधील रहिवासी आहेत.
20 ठिकाणांहून केले 2 लाख 6 हजार 600 रुपयांची ऑनलाइन शॉपिंग
बुलडाणा येथील सर्क्युलर रोडवरील जिजामाता नगरातील माजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी विकास मल्लिकार्जून क्यावल यांचे आयडीबीआय बँकेत खाते आहे. ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या खात्यात 5 लाख 2 हजार 787 रुपयांची प्रायव्हेट फंडाची रक्कम आरटीजीएसद्वारे जमा झाली होती. सोमवारी 30 नोव्हेंबर रोजी क्यावल यांनी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममधून 5 हजार रुपये एटीएमद्वारे काढले. मात्र एटीएम कार्ड मशीनमध्येच विसरले. दरम्यान, अज्ञातानो संधीचा गैरफायदा उचलत एकूण 20 ठिकाणांहून सुमारे 2 लाख 6 हजार 600 रुपयांची ऑनलाइन शॉपिंग केल्याचे विकास यांच्या मोबाईलवरील मॅसेजवरून उघड झाले आहे. याबाबत शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.