महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजबच : स्वॅब न देताच आला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, बुलडाण्याच्या मोताळा कोविड सेंटरमधील प्रकार - Buldhana corona patient number

बुलडाण्याच्या मोताळा येथील सहकार विद्या मंदिर नामक कोरोना केंद्रामध्ये एक अजबच प्रकार समोर आला आहे. स्वॅब न देताच एका नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा प्रकार तांत्रिक कारणास्तव झाल्याचा दुजोरा तालुका वैद्यकीय अधिकारी रवींद्र पुरी यांनी दिला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावरून कोरोना केंद्रातील हलगर्जीपणा उघडकीस आला आहे.

बुलडाणा
बुलडाणा

By

Published : Mar 6, 2021, 7:16 AM IST

बुलडाणा - कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्वॅब दिल्यानंतरच कोरोनाची लागण झाले की नाही, हे समोर येते. मात्र, बुलडाण्याच्या मोताळा येथील सहकार विद्या मंदिर नामक कोरोना केंद्रामध्ये एक अजबच प्रकार समोर आला आहे. स्वॅब न देताच एका नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकाचे नाव पंडितराव देशमुख असे असून ते मोताळा येथील रहवासी आहे. हा प्रकार तांत्रिक कारणास्तव झाल्याचा दुजोरा तालुका वैद्यकीय अधिकारी रवींद्र पुरी यांनी दिला आहे.

बुलडाण्यातील कोरोना केंद्रात स्वॅब न देताच आला अहवाल पॉझिटिव्ह

काय आहे प्रकार?

मोताळ्यातील पंडितराव देशमुख यांना खोकला असल्यामुळे ते 25 फेब्रुवारी रोजी मोताळ्यातील सहकार विद्या मंदिर कोरोना केंद्रात स्वॅब तपासणीसाठी सकाळी गेले होते. याठिकाणी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकाची नोंद घेण्यात आली. मात्र, त्यांना स्वॅबसाठी दुपारी बोलविण्यात आले होते. नंतर दुपारी पंडितराव कोरोना केंद्रात गेलेच नाही. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास सहकार विद्या मंदिर कोरोना केंद्रातून पंडितराव यांना एका महिला कर्मचाराने फोन करत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण चाचणीसाठी स्वॅब न देताच ते पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी त्या महिला कर्मचाऱ्याची चांगलीच खरडपट्टी घेतली. या संपूर्ण प्रकरणावरून कोरोना केंद्रातील हलगर्जीपणा उघडकीस आला आहे.

नेमंक काय घडलं?

पंडितराव हे स्वॅब दिल्यासाठी केंद्रामध्ये आले होते. स्वॅब न देताच ते निघून गेले. त्यांचा नावाचा स्वॅब घेण्याचा ट्युब तयार करण्यात आला होता. त्या ट्युबमध्ये दुसऱ्या नागरिकाचा स्वॅब टाकण्यात आला. शुक्रवारी तो अहवाल पॉझिटिव्ह आला, असे रवींद्र पुरी यांनी सांगितले. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल व ज्यांचा अहवाल पंडितरावाच्या नावाने पॉझिटिव्ह आला त्यांना शोधले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, पंडितरावाच्या नावाने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचे नाव,पत्ता व मोबाईल नंबर लिहल्या गेला नसल्याने या रुग्णांला शोधून कसे काढले याबाबत चर्चा होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details