बुलडाणा- जिल्ह्यातील मेहकर येथील शेतात माती टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना या ठिकाणी पुरातन मंदिराचे काही अवशेष आढळले आहेत. हे अवशेष पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांनी पुरातत्त्व विभागाला कळवले. त्यानुसार नागपूर येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
खोदकामात सापडले पुरातन मंदिराचे अवशेष; बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील घटना - Mehakar village
शेतात माती टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना या ठिकाणी पुरातन मंदिराचे काही अवशेष आढळले आहेत. हे अवशेष पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांनी पुरातत्त्व विभागाला कळवले.
पुरातन मंदिराचे अवशेष
मुंबई कार्यालयाची परवानगी घेऊन पुढील खोदकाम-
पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांनी याठिकाणची पाहणी केली. खोदकामात आढळून आलेले हे अवशेष बाराव्या किंवा तेराव्या शतकातील असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तर या ठिकाणचे पुढील खोदकाम करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मुंबई कार्यालयाची परवानगी घेऊन खोदकाम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी कांचणीच्या महलांसह शहरातील इतर ऐतिहासिक व पुरातन वास्तूंची देखील पाहणी केली.