महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात गेल्या दोन दिवसात नवीन 29 रुग्णांची नोंद - बुलडाणा कोरोना अपडेट

जिल्ह्यात 3 हजार 75 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर 290 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात एकूण 300 कोरोनाबाधित रूग्ण असून सध्या रूग्णालयात 111 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

बुलडाणा कोरोना अपडेट
बुलडाणा कोरोना अपडेट

By

Published : Jul 6, 2020, 8:54 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात नवीन 29 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून शनिवारी प्रयोगशाळेतून प्राप्त 133 अहवालापैकी 126 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर रविवारी 22 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 3 हजार 75 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर 290 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात एकूण 300 कोरोनाबाधित रूग्ण असून सध्या रूग्णालयात 111 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या 7 रुग्णांमध्ये सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील 65 वर्षीय पुरूष, 33 वर्षीय महिला, सिव्हील कॉलनी देऊळगाव राजा येथील 30 वर्षीय पुरूष व 30 वर्षीय महिला, मूळ जळगाव खान्देश येथील मात्र उपचारासाठी खामगाव येथे दाखल असलेला 28 वर्षीय पुरूष, चिखली येथील 35 वर्षीय महिला आणि 19 वर्षीय तरूण या रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान 10 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आहे. त्यामध्ये जलंब नाका खामगांव येथील 27 वर्षीय महिला, मूळ रामदास पेठ अकोला येथील मात्र, खामगाव कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत असलेली 20 वर्षीय तरूणी, 8 वर्षीय मुलगा आणि 12 वर्षीय मुलगी, संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील 27 वर्षीय पुरूष, शेगांवच्या शादीखाना येथील 60 वर्षीय पुरूष, शेगांवच्या आळसणा येथील 45 वर्षीय पुरूष, लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील 42 वर्षीय महिला, मलकापूरच्या मोहनपुरा येथील 30 वर्षीय महिला व शक्तीपुर येथील 40 वर्षीय महिला रूग्णांचा समावेश आहे.

रविवारी प्रयोगशाळेतून प्राप्त 104 अहवालपैकी 82 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 22 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. यामध्ये शेगांव तालुक्यातील आळसणा येथील 55 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 10 वर्षीय मुलगी, 8 वर्षीय मुलगी, 2 वर्षीय मुलगी, 6 वर्षीय मुलगा, 3 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलगा, 38 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी आणि 30 वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. अशाप्रकारे आळसणा येथे 12 रूग्ण आढळले आहे.

बुलडाणा तालुक्यातील धाड-जामठी येथील 26 व 28 वर्षीय महिला, इंदिरा नगर चिखली येथील 55 वर्षीय महिला, नांदुरा येथील 44 व 41 वर्षीय पुरुष, सुलतानपूर येथील 35 वर्षीय पुरुष, 6 वर्षीय मुलगी, जळगाव जामोद येथील 57 वर्षीय महिला, खामगाव येथील 20 वर्षीय तरुण आणि मूळ बोदवड येथील मात्र, सध्या मलकापूर येथे असलेली 24 वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे.

शिवाय रविवारी 4 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आहे. त्यामध्ये मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील 42 वर्षीय महिला, 47 वर्षीय महिला, मेहकर येथील 22 वर्षीय पुरूष आणि मलकापूर येथील 45 वर्षीय पुरूष रुग्णांचा सामावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details