बुलडाणा- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे पेव फुटल्याचे चित्र दिसून येत आहे. आघाडीतील अनेक नेत आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत सेना भाजपची वाट धरत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीदेखील गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
रविकांत तुपकर यांच्या राजीनाम्यानंतर शेट्टींना धक्का, राजीनाम्यानंतर काय म्हणाले तुपकर? - ravikant tupakar
माझी पुढील राजकीय वाटचाल अजूनही ठरली नाही. येत्या दोन ते तीन दिवसात भूमिका जाहीर करणार आहे. तसेच छातीवरचा स्वाभिमानीचा बिल्ला काढताना वेदना होत आहेत, अशी भावनिक खंत व्यक्त करत त्यांनी राजू शेट्टींनी शुभेच्छा दिल्या
तुपकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. बुधवारी त्यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी तुपकरांनी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर तुपकरांशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी वसीम शेख यांनी संवाद साधलाय...
हेही वाचा -MAHA VIDHAN SABHA : पवारांचा 'तो' प्रसिद्ध खंजीर.. राज्यातील पहिले आघाडी सरकार व सर्वात तरुण मुख्यमंत्री
तुपकर यांनी राजीनामा देण्याच्या अगोदर शेट्टी यांना सांगितले की, माझी पुढील राजकीय वाटचाल अजूनही ठरली नाही. येत्या दोन ते तीन दिवसात भूमिका जाहीर करणार आहे. तसेच छातीवरचा 'स्वाभिमानी'चा बिल्ला काढताना वेदना होत आहेत, अशी भावनिक खंत तुपकरांनी व्यक्त केली. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी शुभेच्छा दिल्या असल्याचे तुपकर म्हणाले.