बुलडाणा:सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी, विदर्भातील बुलडाणा, वाशिमसह मराठवाड्यातील उस्मानाबाद व अन्य अशा 16 जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, सोयापेंड आयातीवर बंदी घालावी यासह केंद्र सरकारशी संबंधित विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. रात्री त्यांची आणि काही कार्यकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना चिखली पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आज 12 फेब्रुवारीला दुपारी एक वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी न्यायालयाने रविकांत तुपकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रविकांत तुपकर यांचा अन्यायाविरुद्ध लढा:शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर सप्टेंबर २०२२ पासून लढा देत आहेत. ६ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात एल्गार मोर्चा, २४ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत जलसमाधी आंदोलन त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर राज्याचे कृषी सचिव, कृषी आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा, केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आणि त्याचा पाठपुरावा करून त्याचे पत्र केंद्राला पाठविण्यात आले.